cancer awareness कार्यक्रम संपर्ण

दि 17 जानेवारी 2026 ला टाटा ट्रस्ट व चंद्रपूर फार्मासिस्ट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित cancer awareness कार्यक्रम यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर येथे घेण्यात आला कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्राजक्ता अस्वार (स्त्री रोग तज्ञ) यांनी विद्यार्थिनींना ब्रेस्ट कॅन्सर,सर्विक्स कॅन्सर याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली तसेच कॅन्सर या रोगांवरील उपचार याबद्दल मार्गदर्शन केले सर्विक्स कॅन्सर व उपलब्ध वॅक्सिंन बद्दल सुद्धा माहिती दिली तसेच कॅन्सर या रोगांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल सुद्धा मोलाची मार्गदर्शन केले तसेच डॉ.अमित लांबा यांनी ओरल कॅन्सर बद्दल महत्वाची माहिती दिली तसेच ओरल कॅन्सर वरील उपचार पद्धती व औषधोपचार यावर मार्गदर्शन केले आणि डॉ.आशिष बरबडे यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटल बद्दल माहिती दिली येथे उपलब्ध सोई सुविधा व उपचार याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले तसेच तुम्हाला कॅन्सर रुग्ण आढळल्यास त्यावर उपाय योजना कशा कराव्यात यावर सुद्धा मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता फार्मासिस्ट सागर मंडल यांनी भरपूर मेहनत  घेतली यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य तुक्षार सांबरे सर यांचे सुद्धा मोलाची सहकार्य लाभले
सर्व विद्यार्थीवर्गाने सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच वय वर्ग 9 ते 14 आणि 15 ते 26 वर्ष गटातील मुलींनी cervix cancer पासून बचाव करण्यासाठी म्हणून त्यावरील vaccine लाऊन घेण्यास सांगितले
या वेळी गणेश झाडे(अध्यक्ष),पंकज देशमुख(सचिव) व
चंद्रपूर फार्मसिस्ट फोरमचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *