होमगार्ड सैनिकांची बस भीषण अपघात 40 होमगार्ड जखमी..!

होमगार्ड सैनिकांची बस भीषण अपघात 40 होमगार्ड जखमी..!
चंद्रपूर : नांदेड जिल्ह्यातील एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड्सच्या बस क्रमांक MH 03:

P3279 बसला नांदेड जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे येथे आपले कर्तव्य बजावून परत येत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक सूत्राकडून माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये साधारणपणे अंदाजे 40 ते 45 होमगार्ड जवान प्रवास करत होते. नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत बस भरदाव वेगाने येत असता. बसचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये अनेक होमगार्ड जखमी झाले असून, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयातदाखल करण्यात आले आहे. सूत्राकडून घेतलेल्या माहितीनुसार चंद्रपूर पथकातील होमगार्ड जवान सुरज गेडाम यांची प्रकृती चिंताजनक आहे. ज्याप्रकारे पोलिस पोलिस  विभागातील पोलीस  प्रशासन मदत पुरवते त्याच प्रकारे होमगार्ड सैनिकांना सुद्धा मदत  द्यावी. भीषण अपघातात जखमी झालेल्या होमगार्ड सैनिक जवानांना तात्काळ महाराष्ट्र व चंद्रपूर जिल्हा प्रशासन कडून मोबदला व न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मोहम्मद कादर शेख यांनी मुख्यमंत्री,गृहमंत्रालय,चंद्रपूर जिल्हा अधिकारी, चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ईमेल करून मागणी केली.
या अपघातात जास्तीतजास्त सैनिकांनी पुलिस भर्तीत भाग घेतला आहे. अश्या जवानांना विशेष न्याय देण्यात यावा अशी कडकडीची विनंती केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *