
चंद्रपूर(नि.प्र): चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या प्रचारतोफा १३ जानेवारी रोजी थंडावल्या, परंतु मागील १२ दिवसात प्रत्येक उमेदवारांनी आपली शक्ती प्रचारात झोकून दिली होती .
परंतु वडगाव गाव प्रभाग ८ मध्ये
भारतीय जनता पक्ष व महायुती चे उमेदवार वडगाव प्रभाग क्र.8 मधून देवानंद वाढई हे लोकांची पसंद ठरतं आहे
देवानंद वाढई यांनी पूर्ण ताकदनिशी सर्व मतदारांचे आशीर्वाद घेत डोअर टू डोअर प्रचार करत लोकांच्या संपर्कात राहून आपले प्रतिस्पर्धी उमेदवार यांना मागे ठेवत अखेर प्रचारात आघाडी घेतल्याने वडगाव गाव प्रभागात देवानंद वाढई यांच्या प्रचाराची हवा पसरली, व प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्या पायाखालची माती घसरली” अशी चर्चा या प्रभागात मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने मतदारांचे मन परिवर्तित होणार व देवानंद वाढई विजयी होणार असे अंदाज राजकीय विश्लेषकांकडून लावले जात असून वॉर्डातील, प्रभागातील मतदार “आता आपल्या प्रभागात विकासच हवा,आपण निवडू यावेळी सुद्धा उमेदवार देवानंद वाढई यांच्या विकासाच्या कामाला अजून वेग देऊ असे आग्रही मत मतदार व्यक्त करीत आहे. या प्रभागात ड गटासाठी
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार देवानंद वाढई व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जनविकास सेना (शेकाप) आघाडीचे अधिकृत उमेदवार पप्पू देशमुख
या दोघात आता थेट लढत होणार असून देवानंद वाढई
यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे मत बुद्धीजीवी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
या वेळी या प्रभागात फक्तं विकासच हवा अशी प्रतिक्रिया मतदारांकडून चर्चेदरम्यान व्यक्त केली जात असून देवानंद वाढई
हे आपल्या संपूर्ण पॅनल साठी मत मागत असल्याने मतदाराकडून ही त्यांच्या या प्रामाणिकतेचे कौतुक केले जात आहे वास्तविक पाहता अनेक प्रभागात अनेक उमेदवार पॅनल साठी मत न मागता “मला पाहा मला पाहा” असेच म्हणताना दिसत आहे परंतु
देवानंद वाढई निवडणूक रिंगणात उतरले असले तरी ही त्यांच्यातील सतत परिपक्वता, प्रामाणिकपणा सर्वांच्या नजरेसमक्ष येत असल्याने एक वेगळीच सहानुभूती त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रति निर्माण झाली असून या प्रभागातील मतदारांना या निवडणुकीत ही राजी करण्यात ते यशस्वी झाले असे देखील बोलले जात असल्याने
देवानंद वाढई यांचे पारडे जड झाले असून त्यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार आता कोणते चमत्कार करणार याकडे. जनतेचे लक्ष लागले आहे हे मात्र विशेष!
चंद्रपूर महानगरपालिकेच्या १७ प्रभागात नागरिकांना एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहे, यासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकूण ४५१ उमेदवार उभे आहे. अनेक उमेदवारानी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांना आपलं करण्याचे प्रयत्न केले आपले शक्ति प्रदर्शन ही केले , परंतु या प्रभागात देवानंद वाढई
या उमेदवाराची चर्चा आता ही संपूर्ण प्रभागात सुरु आहे, ही मात्र तेवढेच खरे!
देवानंद वाढई हे या निवडणुकीत सुद्धा रिंगणात उतरले असून अनेकांनी त्यांना आशीर्वाद दिल्याने व ते मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचे नशीब चमकणार ते विजयी होणार असे देखील राजकीय विश्लेषकाकडून बोलले जात आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तब्बल हजारोच्या संख्येने देवानंद वाढई
यांच्या समर्थनात नागरिकांनी प्रचार रॅली काढली होती त्यांना प्रभागातील समस्येची जाण असल्याने व समाजसेवेचा त्यांना लढा लागल्याने जनतेच्या सेवेसाठी मी निवडणुकीत उभा आहोत असे सांगत असल्याने मतदाराचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी ठरत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण की “बोलावे तैसा चालावे” असाच त्यांचा स्वभाव असल्याची नागरिकांना ही जाण आहे.
येथील मतदारांनी देवानंद वाढई यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे जरी बाकी असले तरीही मतदारांच्या मनात त्यांनी आपली एक विशेष जागा निर्माण केली असल्याचे मत ही बुद्धिजीवी वर्गाकडून व्यक्त केले जात आहे.

